शबनम न्युज | पुणे
नव उद्योजकांना तसेच छोटया व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ने २८ व २९ मे रोजी ‘कोथरूड शॉपिंग फेस्टिव्हल ‘ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हा महोत्सव दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळात होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या संयोजन समितीच्या सदस्य डॉ. ऋचा वझे -मोकाशी, दीपा पुजारी यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्पा पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
अभिनेते अजय पुरकर यांच्याहस्ते २८ मे रोजी सकाळी १० वाजता महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. या महोत्सवात खरेदीसाठी कपडे,पुस्तके,दागिने ,बॅग्ज ,फर्निचर ,कॉस्मेटिक्स अशी विविध दालने तसेच अनेक खेळ आणि खाद्यपदार्थांचे एकूण ६४ स्टॉल यांचा समावेश असणार आहे. येणाऱ्या ग्राहकातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कामाची माहिती देणारे दालनही येथे असणार आहेत.
‘विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठी ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या संयोजन समितीच्या सदस्य डॉ. ऋचा वझे -मोकाशी, दीपा पुजारी यांनी केले आहे.महोत्सवाच्या आयोजनातून मिळणारा निधी सामाजिक कार्याला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.