शबनम न्युज | पुणे
आज बालगंधर्व रंगमंदिरात आप च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद अनेकांना धक्कादायी असा ठरणारा आहे. दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र गौतम , राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन,निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे,सिनेकलाकार गौरी करणी रवी वाल्याच्या चाहत खन्ना शेफाली सेठी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
अरविंद केजरीवाल यांची काम की राजनीति पुण्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा. जे दिल्लीत झालं, तो बदल पुण्यात ही शक्य आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे’, असे मत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र गौतम यांनी आम आदमी पक्षाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील निवडणूक मेळाव्यामध्ये व्यक्त केले. त्यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिकेतील आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा आरंभ करून गॅरंटी कार्डचे अनावरण करण्यात आले.
आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी जनतेने आम आदमी पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन यावेळी निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांनी केले तर राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी बूथ बांधणीवर भर देण्याची गरज यावेळी मेळाव्यामध्ये व्यक्त केली. सिनेकलाकार गौरी कर्णिक, रवी वालेचा, चाहत खन्ना, शेफाली सेठी यांनी यावेळी आम आदमी पक्षाच्या काम की राजनीतिला जाहीर पाठिंबा दिला आणि अशा पद्धतीच्या सकारात्मक राजकारणाला सर्वच नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली.किरण कद्रे, विद्या यंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आनंद अंकुश यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने अनेक लोकांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.