शबनम न्युज | चऱ्होली
चऱ्होली येथील काळे काँलनीतील इयत्ता पहिली ते सहावी व आठवी, नववी पर्यंतची शाळा आजपासून चालू झाली आहे. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अँड अनंत काळे, संचालक अँड सचिन काळे ,नवनाथ काळे यांनी शाळेच्या प्रवेशद्धारावर देशभक्तीपर गीते लावून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुले खूप आनंदी झाली, शाळेत असा हा कार्यक्रम प्रथमच झाला. यामुळे सर्वच विद्यार्थी आनंदी झाले होते,त्यानंतर स्वतः संस्थाचालकांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला ,यामुळे शिक्षक, विद्यार्थी खूप आनंदी झाले.
या आनंदमय सोहळा शिक्षक व विद्यार्थी यांनी अनुभवला तर बऱ्याच दिवसांनी शाळा भरल्याने काही मुले खुष होती तर लहान मुले रडताना दिसत होते.तसेच पालकही आपापल्या पाल्याकडे दुरून सर्व पहात होती . यावेळी अँड आनंत काळे ,अँड सचिन काळे,संचालक. नवनाथ काळे, मुख्याध्यापिका सौ स्वाती काळे ,शिक्षिका सपना शिंपी, प्रज्ञा काळे ,सोनल तायडे, हर्षाली पुणेकर, प्रशांत हराळ, पूजा काळे ,संगीता सूर्यवंशी इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.