शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये पेटीएम, गुगल पे, फोन पे या ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाईन पैसे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय तसेच पिंपरी चिंचवड शहरांमधील मनपाच्या सर्वच रुग्णालयांमध्ये गुगल पे फोन पे पे टी एम या ऑनलाईन एप्लीकेशन द्वारे पैसे स्वीकारण्याची सुविधा मनपा रुग्णालयामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे आपल्या पि चि मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये केस पेपर काढण्यासाठी उपचार घेतल्या नंतर बिल भरण्यासाठी किंवा अजून कोणत्याही तपासण्या करण्यासाठी काही शुल्क रक्कम आकारले जाते ती रक्कम भरण्यासाठी मनपा रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना रोख पैसे भरण्याची मागणी केली जाते कोणाकडे खिशामध्ये स्वतः जवळ रोख पैसे असतात कोणाकडे नसतात आजकाल डिजिटल ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण करण्याचा जमाना आहे बरेच लोक खिशामध्ये रोख पैसे ठेवत नाही जेव्हा गरज लागेल तेव्हा ऑनलाईन गुगल पे फोन पे पेटीएम या मोबाईल ॲप द्वारे बाजारात छोट्या व मोठ्या दुकानात हॉटेल मधी भाजी मंडई मध्ये मॉल मध्ये पेट्रोल पंपावर खाजगी रुग्णालयात सिलेंडर बुक करण्या साठी इतर सर्व ठिकाणी ऑनलाईन पैसे स्वीकारण्याचे सोय उपलब्ध आहे परंतु आपल्या पिंपरी चिंचवड मनपाच्या कोणत्याही रुग्णालयांमध्ये ऑनलाईन गुगल पे फोन पे पेटीएम द्वारे पैसे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना खिशात रोख पैसे नसल्यामुळे रुग्णालयातून परत घरी किव्हा बँकेच्या ए टी एम मध्ये जाऊन पैसे कडून आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे नागरिकांना अशी प्रकारे तारे वरची कसरत करून रोख पैसे आणून रुग्णालयात भरावे लागत आहे रोख पैसे नसल्यामुळे बऱ्याच रुग्णांना रुग्णालयातून उपचार न घेता परत जावे लागत आहे रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे सर्व ठिकाणी फोन पे गुगल पे पेटीएम द्वारे पैसे स्वीकारले जात आहे तर मग महानगरपालिका रुग्णालयांमध्ये गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पैसे का स्वीकारले जात नाहीत असा प्रश्न आता शहरातील नागरिकांना पडला आहे.
तरी आपणास विनंती आहे की आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व मनपा रुग्णालयांमध्ये गुगल पे फोन पे पेटीएम यासारख्या ऑनलाईन एप्लीकेशन द्वारे पैसे स्वीकारण्याची सुविधा मनपा रुग्णालयांमध्ये सुरू करावी अशी मनपा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची व नागरिकांची मागणी आहे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही व रुग्णांना रोख पैसे नसल्यामुळे धावपळ करावी लागणार नाही रुग्णालयातून उपचार न घेता परत जावे लागणार नाही तरी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये गुगल पे फोन पे पेटीएम यांसारख्या ऑनलाईन पैसे स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात यासाठी आपणास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने निवेदन देत आहे. असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.