शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘युवोत्सव – २०२३’ क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या अंतिम सामन्यात पीसीसीओई या संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करून अजिंक्यपद पटकावले तर एम. यु. सी. सी. संघाला उपविजेतेपद मिळाले. क्रिकेट मध्ये डी. वाय. पाटील मुलांचा संघ विजयी ठरला. उपविजेतेपद ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेन्टरने मिळवले. इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या मुलींच्या संघाने डी. वाय. पाटील पिंपरी संघावर अंतिम सामन्यात मात केली.
टेबल टेनिस मध्ये आर.एस.सी.ओ. ई. च्या शॉनक सांपूरकर ने विजेतेपद आणि एम.आय.टी. च्या ओम चिलेवारने उपविजेतेपद पटकावले. कौशल कुटे, सायली गोसावी क्रिकेट मध्ये मालिकावीर तर उत्कृष्ट गोलकीपर शरद पिल्लाई, सर्वाधिक गोल यश देशमुख, उत्कृष्ट खेळाडू शरद पिल्लाई यांचा गौरव करण्यात आला. अर्जुन पुरस्कार प्राप्त नेमबाज पूजा घाटकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘युवोत्सव – २०२३’ आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये मुले व मुली या विभागात फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध महाविद्यालयांतील ८५ संघ सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते झाले तर समारोप व पारितोषिक वितरण नेमबाज पूजा घाटकर, टाटा मोटर्सचे वितरक साईबाबा मोटर्सचे विजय राठोड, एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा, विद्यार्थी प्रतिनिधी योगेश आवटे, काव्यश्री पाटील, शुभम फडतरे, दिव्या वर्पे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. प्रास्ताविक डॉ. किर्ती धारवाडकर यांनी तर आभार डॉ. काजल माहेश्वरी यांनी मानले.
पंच म्हणून जबाबदारी राहुल खर्चे, संतोष कुंभार, मंजुनाथ हिरेमठ, शिवप्रसाद शेट्टी, अभिजीत नायडू, विशाल निकम, भरत कोल्हे यांनी स्पर्धेदरम्यान पंच म्हणून काम पाहिले.
क्रीडा स्पर्धांमुळे अपयशाला सामोरे जाण्याची मिळते हिंमत - घाटकर खेळामध्ये नेहमीच आपण विजयी होऊ अशी परिस्थिती नसते. अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागतो. त्यातून अपयशाला सामोरे जाण्याची हिंमत मिळते. याचा उपयोग आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना होतो. म्हणून शालेय जीवनात विविध क्रीडा प्रकार खेळले आणि शिकले पाहिजेत, असे पूजा घाटकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.