शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या करिश्मा सनी बारणे यांच्या पर्यावरण हरित संकल्पनेतून थेरगाव मध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत अनेक ठिकाणी वृक्ष रोपण करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा तसेच आपल्यला आवश्यक असणारे ऑक्सिजन या पर्यावरणतूनच मिळत असते. याकरिता जागोजागी झाडे लावणे आवश्यक असल्याने या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या करिश्मा सनी बारणे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सनी बारणे उपस्थित होते.
Advertisement