शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पंचकुला येथे दिनांक २ ते १३ जून २०२२ दरम्यान चालू असलेल्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची महिला पैलवान प्रगती विनोद गायकवाड हिने ५७ किलो वजनगटात मिळविले रौप्यपदक. पिंपरी चिंचवड शहराला पैलवान प्रगती च्या नावाने महिला कुस्ती वर्गातून प्रथमच खेलो इंडिया युथ गेमस् मध्ये राष्ट्रीय पदक मिळाले आहे अशी ऐतिहासिक कामगिरी करणारी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील एकमेव महिला खेळाडू आहे.
पैलवान प्रगती गायकवाड ही भारतीय खेल प्राधीकरण मुंबई येथे कुस्ती कोच पै. अमोल यादव , पै. अजय सिंग महिला कुस्तीकोच प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. पैलवान प्रगती ही पिंपरी चिंचवड शहरात चिखली येथे राहत असून शालेय शिक्षण प्रेरणा ज्युनिअर काॕलेज निगडी प्राधीकरण येथे घेत आहे.
नुकतीच पैलवान प्रगती हिची भारतीय खेल प्राधीकरण ( साई ) लखनऊ ( युपी ) येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी १७ वर्षाखालील भारतीय महिला कुस्ती संघाच्या इंडिया कॕम्प साठी निवड झाली आहे. हे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबीर दिनांक २५ मे ते २२ जून २०२२ या कालावधीत पार पडणार आहे.