शबनम न्यूज | पुणे
राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित,३१ मे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध जिल्ह्यातून ७२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक-२००१ रुपये,द्वितीय क्रमांक- १००१ रुपये,तृतीय क्रमांक-५०१ रुपये,चतुर्थ क्रमांक-२०१ रुपये,पंचम क्रमांक -१०१ रुपये,गुगल पे द्वारे रक्कम विजयी स्पर्धकांना आणि सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल :
प्रथम क्रमांक:- कु.प्रणिता विठ्ठल बनकर,नाशिक,८५ गुण द्वितीय क्रमांक:- कु.अंकिता आनंदा गोळे,पुणे,७८ गुण,तृतीय क्रमांक:- कु.अंजली कोंडीबा कोळेकर,सांगली,७५ गुण,चतुर्थ क्रमांक:-१)कु.वैष्णवी सुनिल गटकुळ,पुणे,७० गुण,२)कु.सेजल रविंद्र चोरमले,पुणे,६५ पंचम क्रमांक:-१)चि.मंगेश सोमनाथ झंजे,सोलापूर,६२ गुण,२)चि.प्रफुल्ल तोताराम माळी,धुळे,६० गुण.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे हार्दिक – हार्दिक अभिनंदन करण्यात आले.स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय समाजपक्ष,भोसरी विधानसभा अध्यक्ष,राजाभाऊ धायगुडे यांनी यशस्वीपणे केले.