शबनम न्युज | मुंबई
आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराच्या विरोधात संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांमधील सल्लामसलत मंगळवारी वेगवान झाली, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बोलावलेल्या विरोधकांच्या संयुक्त परिषदेच्या आधी राष्ट्रीय राजधानीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट ही घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणुकीसाठी संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा ही ऑफर नाकारली.
यांनतर शरद पवार यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले कि, “सौ. ममता बॅनर्जी यांनी आज मला माझ्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली. आमच्या देशाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आम्ही सविस्तर चर्चा केली,” असे पवार यांनी ट्विट केले.
Ms. Mamata Banerjee called upon me at my residence in Delhi today.
We had a detailed discussion on various issues related to our country.@MamataOfficial pic.twitter.com/ACv62oZtqq— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 14, 2022
Advertisement