शबनम न्युज | पिंपरी
आज १५ जून म्हणजेच लहान मुलांच्या शाळेचा पहिला दिवस. हा शाळेचा पहिला दिवस मुलांना अतिशय महत्त्वाचा असतो. यानिमित्ताने विकास नगर किवळे परिसरातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राजेंद्र तरस व त्यांची पत्नी सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी त्या परिसरातील महानगरपालिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्रतिक्रिया देताना राजेंद्र तरच यांनी सांगितले कि, शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण, नव्या पुस्तकांची नवलाई रांगोळीने सजलेले प्रवेशद्वार आणि जुन्या-नव्या सवंगड्यांना पाहून चिमुकल्यांच्या चेहर्यावरील आनंद अवर्णनीय आहे. आपण शिक्षणाच्या या उत्सवात सहभाग घेतला व या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये आम्हालाही अनंत आनंद झालेला आहे. किवळे परिसरातील महानगरपालिकेचे या शाळेत सर्व विद्यार्थी आनंदी दिसत होते. तसेच सर्व शिक्षक व पालक यांनाही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.