शबनम न्युज | पिंपरी
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून निगडी येथील दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे 21 ते 25 जून या कालावधीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मा. नगरेसविका शर्मिलाताई राजेंद्र बाबर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.21) सकाळी झाले.
निगडी प्राधिकरणातील सुप्रभात ग्रूप, सुर्यनमस्कार, दुर्गा टेकडी यगंर ग्रूप आणि भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योग शिक्षक विनोद कोचरे, संभाजी पाटील हे नागरिकांना योगाविषयी प्रशिक्षण देणार आहेत. पाच दिवस दररोज साकळी सहा ते आठ या वेळेत हा योगाभ्यास होणार आहे.
या योग शिबिराची सुरुवात करून मंगळवारी योग दिन साजरा करण्यता आला. यावेळी योग, प्राणायाम, ध्यानाचे प्रात्याक्षिके करण्यात आली. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, मानसिक सामर्थ्य वाढवणे, सकारात्मक उर्जा तयार करणे यासह योगाविषयी संपूर्ण मार्गदर्शन शिबिरातमध्ये केले जाणार असल्याचे यावेळी शर्मिलाताई बाबर यांनी सांगितले.