शबनम न्युज | पिंपरी
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशनचा साहित्य,कला व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ ” देऊन प्रतिमा अरुण काळे,सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,३५ मधील शिक्षिकेला गौरविण्यात आले.
चांगल्या व गुणवान व्यक्तींना हेरून त्यांच्यात आत्मविश्वास भरून जागतिक स्तरावर चमकविण्यात वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए )अग्रेसर असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व अभिनव खान्देशचे संपादक मा.श्री प्रभाकरराव सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. डब्ल्यूसीपीए तर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ ” च्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
नुकत्याच श्रीरामपूर येथील व्हिआयपी गेस्ट हाऊस सभागृहात झालेल्या आकर्षक समारंभात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैयक्तीक व संस्थात्मक पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले.या प्रसंगी बुलढाण्याचे प्रा.अरूण सावंग,मावळ -पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते तानाजी मराठे,श्रीरामपूरच्या बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस गायकवाड,कृषीतज्ञ श्री.दिनकर पतंगे,प्रा. रामलिंग सावळजकर यांनी वर्ल्ड पार्लमेंटच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अयुर्वेदात व धार्मिक रिवाजात मानाचे स्थान असलेल्या तुळशीला मान्यवरांच्या हस्ते जलार्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ.दत्ता विघावे यांनी केलेल्या प्रास्तविकात संस्थेच्या कार्याची व उपक्रमांची माहिती देताना उपस्थितांचे स्वागत केले तर पुरस्कार्थींचे अभिनंदन केले.
या दरम्यान सा.अभिनव खान्देशने काढलेल्या ” वर्ल्ड पार्लमेंट अवॉर्ड २०२२ ” या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.तर पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या विशेष बॅगचे अनावरणही या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधून सर्व पुरस्कार्थी व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या पुरस्कारात मानपत्र,सन्मानचिन्ह व वर्ल्ड पार्लमेंटचे सदस्यत्व (जागतिक खासदार पद ) देण्यात आले.
या सत्कार समारंभात श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,३५ या शाळेतील शिक्षिका सौ.प्रतिमा अरूण काळे,निगडी-पुणे यांना ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२ ” देऊन गौरवान्वीत आले.
मा.श्री.प्रसन्नकुमार धुमाळ यांनी आपल्या मधाळवाणीने शानदार सुत्रसंचलन करून कार्यक्रमात रंग भरले. शेवटी प्रा.अक्षय तेलोरे यांनी उपस्थितांचे आभार प्रकट करून एका रंगतदार सोहळ्याची सांगता केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डब्ल्यूसीपीएचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन मार्टीन,उपाध्यक्ष प्रा.नरसिंहा मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ.दत्ता विघावे,सचिव बाबासाहेब वाकचौरे,सहसचिव ऋषिकेश विघावे यांनी विशेष प्रयत्न केले.