शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय नवी दिशा प्रकल्पांतर्गत दापोडी येथील प्रेरणा महिला बचत गट,रमाई महिला महिला बचत गट,संकल्प महिला बचत गटातील महिला मंडळ यांना सामुदायिक शौचालय देखभाल व दुरूस्ती कामकाजाचे कार्यादेश पत्राचे वाटप समारंभ आज गुरूवार दिनांक ३०/०६/२०२२ रोजी सकाळी १० वाजता आनंदवन, कृष्ठवसाहत दापोडी फुगेवाडी या ठिकाणी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या शुभहस्ते कार्यादेश पत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा.राजाभाऊ काटे, विरोधी पक्षनेते पिं.चिं.मनपा अनिकेतदादा काटे स्विकॄत नगरसेवक पिं. चिं.मनपा मा.स्वाती काटे मा.नगरसेविका पिं.चिं.मनपा, मा.विजयकुमार थोरात ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी,श्री बहादूरपुरे समाजविकास अधिकारी,श्री महेश आढाव सहा.आरोग्य अधिकारी,श्री किरण गायकवाड जनसंपर्क अधिकारी,श्री रविंद्र तनपुरे ,ह क्षेत्रीय कार्यालय श्रीमती वैशाली लगाडे,श्रीमती विणा तिटकारे, समुह संघटिका,सौ.राधिकाताई अडागळे अध्यक्ष,मातंग एकता आंदोलन,मा नितीन कांबळे सामाजिक कार्यकर्ते, मा.नितीनभाऊ बोधे, मा.प्रदीप भाऊ पोतदार,मा.कुमारभाऊ मते,आशिष काटे तसेच आनंदवन पंचकमिटीचे दिपक धोत्रे,यदू गायकवाड,सुरेश शिंदे,अनिल कांबळे,जितेंद्र चव्हाण,सोमनाथ रंदाळकर,तुषार दोडमणी,लक्ष्मी कापसे,सुरेखा दोडमणी,राधा संगित आदि महिला वग॔ यावेळी मोट्या संख्येने उपस्थित होत्या.