शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप सोबत जाऊन सत्तेत कायम राहू शकत होते आणि आजही राहू शकले असते.पण त्यांनी हार मानली नाही, माघार घेतली नाही. दिलेल्या शब्दाला जागणे म्हणजे काय याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे..!
गेल्या पाच-सहा दिवसापासून ज्या काही राजकीय घडामोडी घडत होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड चा युवक अध्यक्ष या नात्याने त्यावर कोणतीच पोस्ट किंवा टिप्पणी मी केली नव्हती. पण काल उद्धव जी यांनी राजीनामा दिला त्यानंतर मनात असणाऱ्या काही गोष्टी इथं सांगाव्याशा वाटल्या,
शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरें ते पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यापर्यंतच्या या प्रवासादरम्यान माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आपल्यात काही बदल घडून आणले होते ज्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या मनात घर करून गेले तर याच गोष्टीमुळे लबाड लांडगे असलेल्या कट्टर वाद्यांच्या नजरेत ते खूपत होते.
१)त्यांनी सर्वधर्म समभाव मानणाऱ्या हिंदूत्वाचा मार्ग पत्करला.
२) त्यांनी माणसांच्या धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म मोठा मानलं.
३) प्रबोधनकारांचा मार्ग पत्करुन घंटा बडवणाऱ्या नवहिंदूत्वाचा विरोध केला.
४) आदळआपट न करता संयमी वागलेत.
५) भाजप समोर शरणागती पत्करली नाही
६)त्यांनी सरळ सरळ आरएसएस वर हल्ला बोल केला
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे राजधर्म पाळला.
पण मुठभर लोकांना टोकाचे हिंदुत्व पाहिजे.काळानुसार बदल सुध्दा घडला पाहिजे, आणि तो सृष्टीचा नियम आहे, जो थांबला तो संपला.
BJP आणि शिवसेनेला धोका देणारे बांडगुळ एक नंबर चे संधिसाधू आहेत, यात काही नवे नाही.पण तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात उद्धव साहेब घर करून गेलेत ते कायमचंच..!
फ्लोर टेस्ट मध्ये काय होईल ते होईल सत्ता राहील किंवा नाही राहील याचा आम्हाला फरक पडत नाही.भाजप सरकार विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षात जास्त स्कोप असतो जास्त आक्रमकतेने काम करता येते. याच संधीचा फायदा घेत व अडीच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या दोघांनी पूर्ण राज्य चांद्यापासून बांद्यापर्यंत पिंजून काढला पाहिजे व पाठीत खंजीर खुपसणाऱ्या बांडगुळांच्या अवलादी यांचे deposit जप्त होईल याची पद्धतशीर व्यवस्था केली पाहिजे असे मला वाटते..!
इम्रान शेख
युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड