शबनम न्युज | आंबेगाव खुर्द (वृत्तसंस्था)
आंबेगाव खुर्द परिसरात एका अज्ञात व्यक्तीने ज्वेलर्सच्या दुकानात धारदार शस्त्राने हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पीडित विनोद कुमार सोनी (४२) यांनी गुरुवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी हे आंबेगाव बुद्रुक परिसरात ज्वेलर्सचे दुकान चालवतात. दुपारी 4.55 च्या सुमारास एक व्यक्ती ग्राहकाच्या वेशात त्यांच्या दुकानात आला आणि दागिने मागितले. अचानक त्याने सोनी यांच्या डोक्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केले. सोनी जखमी झाला पण मदतीसाठी ओरडत राहिला.
Advertisement