शबनम न्यूज : मुंबई (दि.२८ डिसेंबर) :- MPSC परीक्षेसंदर्भात पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे, परीक्षांची नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. कोरोनामुळे याआधीही अनेकदा परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत, राज्यात सध्या ओमिक्रॉनचा वेगान फैलाव होत आहे, त्यामुळे शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक होत आहेत. ओमिक्रनला रोखण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे, अशातच वय वाढलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना संधी मिळावी, याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021
Advertisement
परीक्षा लांबणीवर टाकताना, परीक्षाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, १ मार्च, २०२० ते १७ डिेसेंबर २०२१ कालावधीत वयोमर्यादा ओलांडली त्या उमेदवारांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ ऑक्टोंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा- 2021 आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 2 जानेवारी, 2022 रोजी पूर्व परीक्षा होणार होती तर मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी होणार होती.