केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल ची परंपरा कायम
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरातील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल या स्कूलने आपली परंपरा कायम करीत यावर्षी सीबीएसई परीक्षेच्या निकालात नेहमीप्रमाणे शंभर टक्के यश मिळविले आहे. सीबीएसई परीक्षेत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे इयत्ता दहावीचे सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत आपल्या या उत्कृष्ट निकालांच्या श्रेणीवर या संस्थेच्या संचालकांनी अभिमान व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वैयक्तिक गुणांची सर्वसमावेशक श्रेणी या परीक्षेत मिळविली असून जी उत्कृष्टता आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक म्हणून या विद्यार्थ्यांच्या या निकालाकडे पाहता येईल.
या स्कूलच्या शिक्षकांच्या वतीने उत्कृष्टरित्या परिपूर्ण असे शिक्षण दिले जाते या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. या स्कूलच्या मार्गदर्शकांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेतले स्कूलच्या वतीने संचालकांनी या यशात योगदान देणारे विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि शिक्षक या सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
या परीक्षेत विशेषतः विद्यार्थी श्रीराम हरी 95.8% विद्यार्थ्यांनी तन्मयी मोरे 94.8%, प्रियांशी पारिक 94%, विद्यार्थी जोनस लिनो 93.2%., विद्यार्थी देवेन मित्तल 92 92.8%,तर सृष्टी गिरंजे 92.6% गुण मिळवून प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे सर्व स्तरातून या स्कूलचे अभिनंदन होत आहे.