शबनम न्युज | मुंबई
आज राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर नव्या वळणावर येऊन ठेपला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती. २०२४ च्या निवडणुकांची तयारी त्यांना करायची होती. पक्ष बांधणी करायची होती, त्यासाठी त्यांना वेळ हवा होता. यामुळे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंची घोषणा करताना आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे म्हटले होते.परंतू आता फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा नड्डा यांनी फोन करून उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले आहे. ते फडणवीस यांनी मान्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
#थेटप्रसारण:-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून @mieknathshinde यांचा राजभवन येथे थपथविधी होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देत आहेत.#Live https://t.co/yy2EUlM9OC— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 30, 2022
Advertisement