शबनम न्युज | मुंबई
मुंबई, ता. ३० : आज राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्य अखेर नव्या वळणावर येऊन ठेपला आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यांनंतर शिंदे म्हणाले कि, हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याचा विकास, सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल. सर्वांना सोबत, विश्वासात घेऊन काम केलं जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत. सर्वांच्या साथीनं विकासाचा गाडा पुढे नेण्याचं काम आम्ही करू, असंही ते म्हणाले.
Advertisement