शबनम न्युज | अहमदनगर
गावाला ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी गावातील वास्तूंचे सुशोभीकरण करण्यासाठी गुंडेगाव नगर तालुक्याला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर प्रवेशद्वार भव्य-दिव्य उभारण्याचे ग्रामपंचायत गुंडेगाव ग्रामस्थांचे नियोजन आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ( कमान ) गुंडेगावच्या वैभवात भर घालण्याबरोबरच शिवाजी महाराजांचा इतिहास जागविण्याचे काम करणार आहे , असा ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गावातील अनेक नोकरदार, व्यावसायिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायत सदस्या साधनाताई चौधरी युवा नेते सतिश काका चौधरी यांनी यांनी यासंदर्भात सुचना केली . यावेळी संरपच मंगलताई सकट, उपसंरपच संतोष भापकर,ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ, संतोष धावडे, भाऊसाहेब हराळ, प्रा.रंगनाथ भापकर, राहुल चौधरी, नानासाहेब हराळ दुकानदार, एकनाथ कासार, संतोष कोतकर, बाळासाहेब माने सर,इतिहास संशोधक दादासाहेब आगळे, सचिन जाधव, पत्रकार संजय भापकर आदी उपस्थित होते.
युवा नेते, तरुणांनाचे मार्गदर्शक सतिश काका चौधरी यांच्या संकल्पनेतून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे ऐतिहासिक सुशोभीकरण केले जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी नाशिकहून एक्सपर्ट यांच्या शिष्टमंडळाने नियोजित कामांबाबत सविस्तर चर्चा केली आसून अंदाजे २५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे . ऐतिहासिक कमान कशी असावी, त्याच्या सुशोभीकरणासाठी वापरले जाणारे साहित्य कसे असावे, याचे सादरीकरण संगणाकाद्वारे करण्यात आले. सुशोभीकरण ऐतिहासिक दगड असणार आहे. हे साहित्य अत्यंत टिकाऊ, मजबूत असते. त्यावर हवामान, पाऊस व पाण्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे माहिती यावेळी देण्यात आली.
गुंडेगावच्या वैभवात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारामुळे भर पडणार आहे. प्रवेशद्वार उभारण्यासाठी येणारा निधी लोकसभागातून गोळा करण्यात येणार आहे आसे सतिश चौधरी यांनी सांगितले, सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे, छत्रपती शिवाजी महाराज झेंडा चौकात सुशोभिकरण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा नगर रस्ता ३ मीटर आसताना सतिश काका चौधरी व ग्रामस्थांच्या विनंती वरुन ४ मीटर डांबरीकरण करण्यात आले आहे, लवकरच या रस्त्याच्या बाजूने पेव्हिग ब्लॉक ग्रामपंचायतीच्या निधी अर्तगत बसविण्यात येणार आसून आजुबाजुला सुशोभिकरण करण्यात येणार आहे व प्रत्याक्षात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात होणार आहे.