मा. नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वतीने अजित पवार यांचा वाढदिवस सरस्वती अनाथ आश्रम येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड उद्योगनगरीचे शिल्पकार महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सरस्वती अनाथ आश्रम येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून शालेय उपयोगी साहित्याचे वाटप पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीने मा. नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जाफरभाई शेख,सुभाष मामा शिंदे,अॅलेक्स दास,सिद्राम मेत्रे व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री यासह अनेक महत्त्वाची पदे दादांनी भूषवले त्यातून पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड ला सदैव प्रगतीपथावर नेण्याचे काम दादांनी केले आहे. अशा लाडक्या दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे मनोगत कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.