शबनम न्युज | पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांच्या यमुनानगर, निगडी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की प्रसाद कोलते यांनी यमुनानगर, निगडी तसेच शहर पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविला असून यापुढेही कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध योजना व प्रभागातील विविध कामे करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची गरज आहे ती गरज ओळखून प्रसाद कोलते यांनी एक चांगले सुसज्ज कार्यालय तयार केले आहे. यमुनानगर, निगडी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसाद कोलते यांचे जनसंपर्क कार्यालय खऱ्या अर्थाने जनसेवेचे प्रमुख केंद्र बनेल. असा विश्वास व्यक्त करीत पवार यांनी यावेळी प्रसाद कोलते आणि प्रियाताई कोलते यांच्या कार्याचे कौतुक केले. आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘दादां’ची क्रेझ…
महाराष्ट्राचे ‘ दादा ‘ म्हणून अजित पवार सर्वांना परिचित आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांची युवा कार्यकर्त्यांत मोठी क्रेझ आहे. अजित पवार यांच्या कामाची पद्धती , शिस्त तसेच कामाचा उरक याबाबींमुळे युवा कार्यकर्त्यांची संख्या त्यांच्या सोबत अधिक असते. आजच्या कार्यक्रमातही युवकांची संख्या मोठी होती. दादांची क्रेझ कायम असल्याचे यातून दिसून आले. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, युवक प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मा.नगरसेवक नाना काटे, मा.नगरसेवक प्रशांत शितोळे, मा. नगरसेविका सुमनताई पवळे, प्रदेश युवक उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, कार्याध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिंचवड शाम जगताप,युवक उपाध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिंचवड मयूर जाधव, सरचिटणीस रा.यु.काँ.पिं. चिंचवड प्रतीक साळुंखे, अक्षय माछरे, सुनील राणे, कुणाल साने, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, राजू खाडे, अनिल भोसले,विवेक गवळी, रमेश निकाळजे, सोमनाथ कदम, डिगा उदयकुमार, शमाकांत नांगरे, राजेश भगत, निखिल दळवी,ओमकार पवार तसेच महिला, तरुण कार्यकर्ते,नागरिक आणि प्रसाद कोलते यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून स्थानिक पातळीवर काम करत असताना, एक छोट्याश्या कार्यालयाची गरज भासत होती. उद्घाटनासाठी काही महिन्यांपूर्वी मी दादांना फोन केला, परंतु दादांच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळत नव्हती. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांचे काम आणि पक्षनिष्ठा दादा मात्र विसरले नव्हते. मागच्या आठवड्यात अचानक दादांच्या पिए चा फोन आला की, दादा उद्घाटनासाठी येणार आहेत. आज दादा आपल्या सर्वांसमोर मी आणि माझ्या पत्नीच्या कार्याचे कौतुक करत आहेत, यामुळे माझे उर भरून आले आहे. मला एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. मी इथून पुढे स्थानिक पातळीवर असेच सक्रिय राहून, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजून बळकटी देणार आहे. आजच्या या उद्घाटनप्रसंगी शहरातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे नागरिक महिला बंधू भगिनी, तरुण सहकारी मित्र,माझे कुटुंबीय तसेच अजित भाऊ गव्हाणे, विशाल भाऊ वाकडकर आणि विशाल काळभोर यांचे विशेष आभार. - प्रसाद गणपत कोलते (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड)