शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांच्या माध्यमातून तसेच नाना काटे सोशल फाउंडेशन वतीने प्रभागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता हेल्थ कार्ड वाटप करण्यात येणार आहे.
या हेल्थ कार्ड च्या माध्यमातून प्रभागातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. सदर हेल्थ कार्ड हे केअर लाईफ लाईन हॉस्पिटल थेरगाव यांच्या विशेष सहकार्याच्या माध्यमातून दिले जाणार आहे. सदर हेल्थ कार्ड हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यास रुपये पाच हजार पर्यंतची वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच सदर हेल्थ कार्ड धारकाची एक वर्ष ओपीडीपी आकारली जाणार नाही, तसेच सदर हेल्थ कार्डधारकास डॉक्टरांची एक वर्ष होम व्हिजिट मोफत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास नॉर्मल अथवा सिजेरियन प्रसूतीचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच मुलगा जन्माला आल्यास दहा हजार मध्ये नॉर्मल डिलिव्हरी व वीस हजार रुपयांमध्ये सिझेरियन डिलिव्हरी करण्यात येईल, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि पुणे मधील तज्ञ डॉक्टर्स यांच्यातर्फे काही ऑपरेशन अल्प दरात केले जाणार आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर या हेल्थ कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरोग्य सेवेसाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रशांत सपकाळ यांचे जनसंपर्क कार्यालय, शशीदीप निवास, महादेव मंदिराजवळ ,थेरगाव येथे करण्यात येणार आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी ९१३०००८०२० / ९३७०१४१७७४ / ९१७५२९६८५५ / ८४४६००९९ ५४ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.