शबनम न्युज | पुणे
पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ७.५६ लाख रुपये किमतीच्या मेफेड्रोन सह दोघांना अटक केली. सर्फराज इक्बाल मेमन (वय,४२) आणि अन्सारी जमीर अहमद अब्दुल खालिक (वय,४३, दोघेही रा. मुंबई) अशी संशयित तस्करांची नावे आहेत.
Advertisement
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी सेलचे निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे आणि उपनिरीक्षक एस.डी. नरके यांच्या गस्ती पथकाने शुक्रवारी पहाटे कोंढवा येथील खडी मशीन चौकात सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर केलेल्या झडतीदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ५४ ग्रॅम एमडी आणि मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम जप्त केली.
Advertisement