शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
प्रभाग क्रमांक १५ निगड़ी प्राधिकरण मधील गणपती विसर्जन घाट गणेश तलाव मधील जलपर्णी काढा, अशी मागणी निखिल दळवी (संस्थापक/अध्यक्ष – विठ्ठल प्रतिष्ठान) यांनी आयुक्त. पिंपरी चिंचवड़ मनपा, पिंपरी पुणे – १८ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १५ निगड़ी प्राधिकरण मधील गणपती विसर्जन घाट गणेश तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे तलावाच्या आजू-बाजुच्या परिसरात मच्छर, डास यांचे प्रमाण वाढले आहे. गणेश तलाव स्वच्छ होत नसल्यामुळे परिसत दुर्गंधी पसरली आहे. जलपर्णी मुळे तलावात पाणी आहे कि, नाही हे देखील समजुन येत नाही. संपूर्ण गणेश तलावमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी परसली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात म्हणजेच ०९ सेप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन आहे. गणेश तलाव येथे ही विसर्जन घाट आहे, दर वर्षी परिसरातील लाखो भाविक आपले गणपती विसर्जन करण्यास गणेश तलाव येथे येत असतात. तरी अनंत चतुर्दशी अगोदर गणेश तलाव मधील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करावा, अशा स्थानिक नागरिकांच्या भावना आहेत. जलपर्णीमुळे परिसरात होणारे मच्छर, डास व जलपर्णी मुळे परिसरात पसरणाऱ्या दुर्गन्धी याचा ही परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी गणेश तलाव मधील जलपर्णी व साठलेली घान लवकरात लवकर काढून गणेश तलाव स्वच्छ करावा अशी तक्रार आम्ही स्थानिक नागरिकांच्या वतीने दिनांक – ०४/०७/२०२२ रोजी केली होती. तक्रार करून ५० दिवस म्हणजेच दीड महिना होऊन सुद्धा सदर गणेश तलाव मधील अजुन ही गाळ व जलपर्णी काढण्यात आली नाही किंवा स्वच्छता करण्यात आली नाही तलावामध्ये घानीचे साम्राज्य पसरले आहे. चार दिवसांनी म्हणजेच ३१ ऑगस्ट पासुन गणेश उत्सव सुरु होत आहे. दीड दिवस पासुन ते ११ व्या दिवसा पर्यंत नागरिक गणेश तलाव येथे आपले गणपती विसर्जन करण्यास येत असतात गणेश उत्सव सुरु होण्यास चार दिवस बाकी आहेत. अजुन गणेश तलावा मधील गाळ व जलपर्णी पूर्ण पणे काढण्यात आली नाही संपूर्ण स्वच्छता देखील करण्यात आली नाही गणपती विसर्जन कोठे करायचे हा प्रश्न आता सर्व गणेश भक्तानांसमोर उभा राहिल आहे तरी आपणास सर्व गणेश भक्तांच्या वतीने व विनंती करता आहोत की गणेश उत्सव सुरु होण्या अगोदर गणेश तलाव मधील गाळ व जलपर्णी लवकरात लवकर कडून तलाव संपूर्ण स्वच्छ करावा, असे ही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.