शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना महावितरणचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व त्यावर कायम स्वरूपी उपाय योजनेकरिता महावितरणचे क्षेत्रीय संचालक अंकुश नाळे यांचे बरोबर चर्चा सत्र क्वालिट सर्कल फोरम, भोसरी या ठिकाणी आयोजित केले होते. या चर्चा सत्रात संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, सह सचिव प्रवीण लोंढे, खजिनदार संजय ववले, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संघटनेचे संस्थापक व मा. अध्यक्ष तात्या सपकाळ, मा. अध्यक्ष सुरेशतात्या म्हेत्रे, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, प्रमोद राणे, भारत नरवडे , अतुल इनामदार,सचिन आदक उपस्थित होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता राजदीप, कार्यकारी अभियंता भोसले भोसरी, कवडे,चव्हाण, चौधरी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकांना महावितरण संदर्भातील समस्या मांडण्याकरिता संघटने तर्फे अध्यक्ष संदीप बेलसरे,सचिव जयंत कड,संचालक प्रमोद राणे, यांनी पुढाकार घेतला. अध्यक्ष संदिप बेलसरे व मा.अध्यक्ष सुरेशातात्या म्हेत्रे यांनी औद्योगिक परिसरात महावितरणने चार सबस्टेशन निर्माण करावेत अशी मागणी क्षेत्रीय संचालकाकडे केली.
उद्योजकांना येणाऱ्या समस्या खालीलप्रमाणे..
१. फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे.
२. फिडर CRIMPING
३. फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे.
४. फिडर पिलर मधील HRC, फ्युज वायर व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व खराब
झालेले दरवाजे बदलणे.
५. वेगवेगळ्या साईजचे केबल stock मध्ये ठेवणे व गरजेच्यावेळी २४ तास उपलब्ध करून देणे
कारण बऱ्याच वेळेला केबल उपलब्ध नसते.
६. केबल नादुरुस्त वाहन ( FOULT FINDING VEHICALS) वेळेवर उपलब्ध करून देणे.
७. फिडरची लांबी कमी करणे व त्यासाठी लागणारे BAY BRAKER व केबल्स उपलब्ध करून
बसवून देणे त्यामुळे फिडरवरील विजेचा लोड कमी होऊन तक्रारी कमी होतील.
८. ओव्हर लोड ट्रान्सफॉरमरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी आवश्यक
तेवढीच ठेवणे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉरमर बसविणे.
९. महावितरणच्या पिंपरी चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर झालेला DPR कार्यान्वित
करणे व नवीन DPR साठी पाठपुरावा करणे.
१०. सध्या अस्तित्वात असलेली स्विचिंग स्टेशन्स ओव्हर लोड आहेत, त्यांची संख्या वाढविणे.
११. भोसरी विभागातील इंद्रायणी सेक्सशनला ASSISTANT इंजिनिअर्स देणे कारण पूर्वी
भोसरी व इंद्रायणी नगर असे दोन विभाग होते, तो आता एक विभाग केला आहे. त्यामुळे
२ ASSISTANT इंजिनिअर्स होते तो एक केला आहे. MANPOWR डबल होती ती
देखील अर्धी केली व एरिया वाढवला, त्यामुळे ASSISTANT इंजिनिअर्स व MANPOWER
सर्वच डबल करणे.
१२. औद्योगिक परिसरातील संबधित विभागातील लाईनमनची संख्या वाढविणे.
१३. व्हॉटसप ग्रुपमधील तक्रार MSEDCLच्या अधिकाऱ्यांनी बघून त्या तक्रारीचे त्वरित
निराकरण करावे.
१४. दर महिन्याला कार्यकारी अभियंता आणि संघटना पदाधिकारी यांचेबरोबर मिटिंग घेऊन
झालेली कामे यांचा आढावा घ्यावा.
१५. महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी शटडाऊन घेऊन PREVENTIVE मेंटेनन्सची कामे मार्गी
लावणे.
१६. थकीत वीज बिलांचे ग्राकाना तात्काळ सुलभ हप्ते करून देणे.
१७. ज्या ठिकाणी अंडर ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे शक्य आहे त्या ठिकाणी अंडर ग्राउंड
वीज वाहक केबल्स टाकणे.
१८. वीज कनेक्शन कट करण्यापूर्वी वीज ग्राहकाला दोन दिवस अगोदर कल्पना देणे.
१९. महावितरणच्या पिंपरी व चिंचवड विभागातील खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारी प्रचंड
प्रमाणात वाढलेल्या आहेत. या विभागातून सदर तक्रारीकडे दोन दोन दिवस कोणीही लक्ष
देत नाही. त्यावर उपाययोजना करणे व कायमस्वरूपी कार्यक्षम अधिकारी नेमणे.
२०. काही अनोळखी लोकांकडून महावितरणच्या रोहित्र व डी.पी. जवळच टाकाऊ कचरा जाळला
जातो त्यावर उपाययोजना करणे.
२१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना
यांची एक संयुक्त बैठक घेऊन महापालिका रस्ता खोदाई करतांना महवितरणच्या केबल्स
तोडल्या जातात त्यावर संयुक्तपणे उपाययोजना करणे.
महाराष्ट्र राज्यातील वीज वितरण यंत्रणा मजबूत करण्यासाठी ३९ हजार ६०२ कोटीच्या सुधारित वितरण क्षेत्रातील योजनांपैकी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च हा केवळ वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यावर होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना
वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होवून ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल असा दावा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी केला आहे १४ हजार कोटीच्या निधीतून राज्यात विविध ठिकाणी ३७७ नवीन उपकेंद्रे उभारली जाणार आहे. २९२ उपकेंद्राची क्षमता वाढवून त्यामध्ये सुमारे २९ हजार ८९३ नवीन वितरण रोहित्रे बसविली जातील. या शिवाय उच्चदाब वीज वाहिनी भूमिगत टाकण्यात येणार आहे. असे श्री. विजय सिंघल यांनी सांगितले आहे. याचा लाभ भोसरी वीज वितरण विभागाने करून घ्यावा.
तातडीने करावयाची कामे
१. पेठ क्रं. ७ व १० साठी ४ BAY BRAKER व त्यासाठी केबल्स देणे व ती INSTALL करून फिडर नं.१ व २ वरील लोड कमी करणे कारण त्यावरून प्रचंड प्रमाणात वीज खंडित होत आहे. त्यामुळे सब स्टेशन मधून वारंवार फिडर बंद करण्यासाठी परमिट घ्यावे लागणार नाही. त्यामुळे एखाद्या FOULT साठी ४० ते ५० मिनिटाचे २ वेळा म्हणजे ८० ते १०० मिनिटे POWER बंद राहणार नाही.
वरील समस्या उद्योजकांनी मोठ्या पोटतिडकीने क्षेत्रीय संचालक नाळे साहेबांकडे मांडतांना महावितरणच्या भोंगळ कारभारावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
समस्यांवर उत्तर देतांना क्षेत्रीय संचालक यांनी प्रामुख्याने भोसरी, आकुर्डी, निगडी व पिंपरी विभागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व इतर समस्यांचे एक महिन्याच्या आत कायमस्वरूपी उपाय करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच कुदळवाडी एरियातील औद्योगिक व रहिवासी कनेक्शन वेगळे करावे व औद्योगिक कनेक्शन टाटा मोटर्स फिडरला जोडले जावे ही सततची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
संघटनेच्या सभासदांना येणाऱ्या विविध अडचणी अध्यक्ष संदिप बेलसरे व संचालक प्रमोद राणे यांनी क्षेत्रीय संचालाकासमोर विस्तृतपणे मांडल्या. सदर चर्चा सत्राचे सूत्रसंचालन जयंत कड यांनी केले.