मोशी टोल नाक्याजवळ प्रशस्त अशा चार गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती
पिंपरी चिंचवड : गणरायाचे विसर्जन विसर्जन कुंडातच करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रा राजेश सस्ते यांनी केले आहे.प्रा राजेश सस्ते व अर्चना सस्ते यांच्या वतीने मोशी परिसरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत गणरायाची आरती करण्यात येत आहे तसेच अनेक मंडळांना देणगी देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या गणेशोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेते ,सामाजिक कार्यकर्ते, अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन, तसेच संस्थापक अध्यक्ष – वेदिक विस्डम एज्युकेशनल ट्रस्ट प्रा. राजेश सस्ते यांच्यावतीने या गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच विविध गणेश मंडळांना भेटी देऊन राजेश सस्ते यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात येत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राजेश सस्ते व कै पराग अभंग सोशल फाउंडेशन च्या वतीने गेली दोन वर्षापासून गणेश मूर्ती विसर्जन कुंड सुरू केले आहे ,,आपली पवित्र इंद्रायणी नदीचे प्रदूषण थांबवू व पर्यावरणाचे रक्षण करू असे आवाहन करत राजेश सस्ते यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येत आहे की मूर्ती विसर्जनासाठी याच विसर्जन कुंडाचा वापर करावा .मोशी टोल नाक्याजवळ प्रशस्त अशा चार विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे तरी नागरिकांना विनंती की मूर्ती विसर्जन या विसर्जन कुंडातच करण्यात यावी असे आवाहन राजेश सस्ते यांनी केले आहे.
बाप्पा आपला स्वाभिमान करूया निसर्गाचा सन्मान चला करूया मूर्तिदान जपूया पर्यावरणाचे भान
नागरिकांनी गणेश विसर्जना करिता संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे याकरिता 74 98 62 84 41 तसेच 96 60 48 27 85 या नंबर वर संपर्क साधण्याचे ही आवाहन राजेश सस्ते यांनी केले आहे