पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब मगर बँकेचे विद्यमान चेअरमन व वैदिक विस्डम एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राजेश सस्ते यांनी आज गणेशोत्सवानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष मित्र मंडळ आदर्श नगर,संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ गंधर्व नागरी, गंधर्व नागरी फेज 2 मित्र मंडळ , शिवराज मित्र मंडळ गंधर्व नागरी ,मोरया मित्र मंडळ सस्ते पाटील नगर इत्यादी गणेश मंडळांना भेटी दिल्या तसेच गणरायाची आरती केली.
प्राध्यापक राजेश सस्ते हे मागील 15 ते 20 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत या सामाजिक जीवनात राजेश सस्ते यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले या सामाजिक उपक्रम राबविताना त्यांनी अनेक गरजू नागरिकांना उपयोगात येतील असे समाज उपयोगी उपक्रम राबविले यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच स्वच्छता अभियान अन्नदान असे अनेक उपक्रम राबवीत परिसरातील नागरिकांना आपण करीत असलेल्या सामाजिक उपक्रमातून अनेक लाभ मिळवून दिला आहे या गणेशोत्सव निमित्त राजेश सस्ते हे पहिल्या दिवसापासूनच अनेक गणेश मंडळांना भेटी देत आहेत तसेच गणरायाची आरती करून जनजागृतीचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे व हे जनजागृतीचे अभियान आपण भविष्यकाळातही असेच राबविणार असल्याचे राजे सस्ते यांनी सांगितले