शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे मॅनेजमेंट सेलचे शहराध्यक्ष अकबर रशीद मुल्ला यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्यांवर तसेच पक्षाच्या ध्येय धोरणाबद्दल बैठक आयोजित केली. या बैठकीत अकबर मुल्ला यांनी विविध विषयांवर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, तसेच मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड शहरात आगामी काळात महानगरपालिका निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकावर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे, पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी मध्ये बदल झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्या सत्ता काळातच झाले आहे.
राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास केला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मोठे मोठे प्रकल्प अजितदादा यांनीच राबविले आहे पिंपरी चिंचवड शहरात परत एकदा राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करावयाची आहे. या दृष्टिकोनातून आपण पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे अकबर मुल्ला यांनी यावेळी सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड शहरात भाजपची सत्ता असताना त्यांनी कोणती विकासात्मक कामे केली? याचे उत्तर भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे नाही. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहरात केलेली पाच विकास कामे सांगा.असे जर विचारले तर भाजपच्या नेत्यांना सांगता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले कारण भाजपकडे या प्रश्नाचे एकही उत्तर नाही त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करणे आणि शहराचा विकास करणे हेच आपल्या सेलचे ध्येय धोरण असेल असेही अकबर मुल्ला यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी सौरव अविनाश देसाई पिंपरी विधानसभा समिती अध्यक्ष किरण वावळ, प्रणव पवार, शुभम, सुलतान खान, अंसारी , सणावल शेख ,अर्जुन भोसले,दलीम शेख, फिदा हुसेन, सिकंदर शेख ,सनावल बी शेख,अशपाक शेख, विशाल चंपावत, मंजूर कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.