शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना व ActionCOACH यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय व्यवस्थापन आणि वाढ कशा प्रकारे करता येईल यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इड.अँड अग्रीकल्चर, भोसरी पुणे- २६. येथे सेमिनार विनामूल्य आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले.
सदर सेमिनारमध्ये संघटनेच्या वतीने अध्यक्ष- संदीप बेलसरे, सचिव- जयंत कड, खजिनदार- संजय ववले, प्रसिद्धी प्रमुख- विजय खळदकर, रमेश होले, राजू देशपांडे, दिनकर साळुंखे, बशीरभाई तरसगार, सुनील शिंदे व अनेक उद्योजक उपस्थित होते. तसेच ActionCOACH च्या वतीने अशोक समसी व सुनील रोकडे हे उपस्थित होते.
या सेमिनारमध्ये सध्या चालू असलेल्या उद्योगात टर्नओवरमध्ये कशा प्रकारे वाढ करता येईल, वेळेचे आणि कामाचे योग्य नियोजन कसे करायचे, विक्री कशा प्रकारे वाढवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. कामगार, ऑफिस कर्मचारी, यांची काळजी घेऊन त्यांचा यात सहभाग वाढवून उत्पादन कसे वाढवायचे, उत्पादन खर्चात बचत करून नफा कशा प्रकारे वाढवता येऊ शकतो याचे प्रशिक्षण देण्यात आले.
विशेष म्हणजे हे सर्व आपल्या कुटुंबाला वेळ देऊन, आपल्या तब्बेतीची काळजी घेऊन उद्योग कशा प्रकारे वाढवला जाऊ शकतो याचे वेगवेगळे दाखले देऊन अशोक समसी यांनी उद्योजकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.