शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
प्रभागात ‘लक्षवेध फाउंडेशन ‘ च्या मदतीने लम्पी हटवा, पशुधन वाचवा ‘ ही मोहीम प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट यांच्या वतीने स्वखर्चाने जनावरांचे लसीकरण करून राबविण्यात येत आहे.
अर्थव्यवस्था कणा असलेला शेतकरी चहूबाजूंनी संकटांनी वेढलेला दिसून येत आहे . सद्य:परिस्थितीत कांद्याचा पडलेला भाव , ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीतील उभ्या पिकांचे नुकसान आणि त्यातच भर म्हणजे बळीराजाचे महत्वाचे साधन असलेला व दुग्ध उत्पादनाचे साधन असलेल्या जनावरांना लम्पी रोगाचा संसर्ग सुरू आहे.
यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असताना लक्ष वेध स्पोर्ट्स फाउंडेशनने लम्पी हटवा , पशुधन वाचवा ही मोहीम सुरू केली आहे.जनावरांना मोफत लसीकरण करून शेतकऱ्यांना दिलासा देत आहे.लक्ष वेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट, यांनी आपला सामाजिकतेचा वारसा पुन्हा एकदा जपला आहे . मोशीतील सावतामाळी नगर , बोऱ्हाडेवाडी, आणि जाधववाडी येथे घरोघरी जाऊन जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे मोशी भागातील शेतकरी व गोठा मालक यांनी आनंद व्यक्त केला आहे.