शबनम न्युज | पिंपरी
महाराष्ट्र माथाडी श्रमजीवी कामगार जनरल युनियनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुरज गजानन बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा. खासदार स्व. गजानन बाबर यांच्या निधनानंतर सुरज बाबर यांची अध्यक्षतेपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती युनियनचे जनरल सेक्रेटरी तानाजी कदम यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना तानाजी कदम म्हणाले कि, सुरज बाबर यांची १ ऑक्टोबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या महिन्याच्या कालावधीसाठी अध्यक्षतेपदेसाठी नियुक्ती करण्यात आली असून, ज्या कामगारांना न्याय मिळत नाही, पीडित कामगार व असुरक्षित असणारे कामगार तसेच कोणत्याही आस्थापनेमध्ये अनोंदीत कामगार असतील, त्या माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरज बाबर पाहतील, तसेच महाराष्ट्र शासन आस्थापित महाराष्ट्र मधील ३६ माथाडी मंडळे आहेत. त्या त्या जिल्ह्यामधील माथाडी मंडळामध्ये अनोंदीत आस्थापना नोंदीत करणे, तसेच आस्थापने मधील अनोंदीत कामगार माथाडी स्वरूपाची कामे करीत असतील, त्या कामगारांना माथाडी मंडळात नोंदीत करणे, तसेच अनोंदीत आस्थापनांची व अनोंदीत कामगारांची माहिती माथाडी मंडळात देणे व त्या आस्थापनांना व कामगारांना माथाडी मंडळात नोंदणी करणे, तसेच नोंदीत कामगारांचे वाद माथाडी मंडळात मिटवणे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळामध्ये नोंदीत /अनोंदीत आस्थापना व नोंदीत /अनोंदीत कामगार यांच्या प्रश्नांचे निवारण माथाडी मंडळामध्ये सुरज बाबर यांच्या अध्यक्षतेखाली केले जाणार आहे, अशी माहिती तानाजी कदम यांनी दिली आहे.