शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
सदाशिव पेठेतील हॉटेलला लागलेल्या आगीत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदाशिव पेठेतील हैदराबादी बिर्याणी हॉटेलला शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत इरा नईम खान या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी १० .५२ च्या सुमारास ही घटना घडली.
Advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीची सुटका करून तिला रुग्णालयात दाखल केले असले तरी, भाजल्याने तिचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी हॉटेलमधून तीन एलपीजी सिलिंडर काढले आणि सकाळी ११ .०५ च्या सुमारास आग आटोक्यात आणली.