शबनम न्युज | आळंदी
शरदचंद्र पवार महाविद्यालयात उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र व चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रा. लि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व पूजा बुद्धवंत, शारदा बुद्धवंत, दिव्या मुसांडे व मेघा भंगाळे यांच्या स्वागत गीताने झाली.प्रास्ताविक करतांना डॉ. राजू शिरसकर यांनी उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त असून कार्यक्रमाचा उद्देश व ध्येय सविस्तर स्पष्ट केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. कैलास अस्तरकर यांनी सविस्तर करून दिला. यावेळी ज्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी उद्योगात व्यवसायात ठसा उमटविला अशा अभिषेक हातेकर, आदित्य गावडे,कृष्णा काकडे व ज्ञानेश्वर लोखंडे या उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार व ‘वॉल ऑफ ऑनर’ (सन्मानाचा फलक ) बोर्डाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रमुख पाहुणे अमित मखरे अध्यक्ष- चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रा. लि. अहमदनगर यांनी कोणताही उद्योग व्यवसाय करण्यासाठी बुद्धी व मेहनत याची कशी जोड आवश्यक आहे हे स्पष्ट करीत व्यवसायाला उच्च स्थानावर नेण्यासाठी टीम वर्कची आवश्यकता व्यक्त केली. व्यवसायामधून प्रत्येक व्यावसायिकाला कसा आदर व पैसा मिळतो हे विविध उद्योजकांचे दाखले देत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रा. लि. अहमदनगरच्या वतीने महाविद्यालयात ई लायब्ररी संकल्पना सुरू करण्यात आली असून त्यामध्ये विविध उद्योगांची सविस्तर माहिती, प्रोजेक्ट रिपोर्ट, मार्केटिंग,अर्थपुरवठा इत्यादी माहितीचा समावेश असून चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रा. लि. या संस्थेच्या वतीने तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ९० तासाचा कौशल्यावर आधारित अल्पकालीन उद्योजकता विकास कार्यक्रम राबिवण्यात येणार आहे असे सांगितले तसेच ‘वॉल ऑफ ऑनर’ हि संकल्पना म्हणजे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी उद्योजकांच्या मुलाखती घेऊन त्याचे व्हिडिओ तयार करून त्या प्रत्येक व्हिडिओला क्यू.आर. कोड देण्यात आलेला आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच नवीन विद्यार्थ्यांना उद्योजकतेची प्रेरणा मिळेल असे मत व्यक्त केले. या या उपक्रमामध्ये शुभम गिघे,निखिल खांदवे,वैभव काळे अभिषेक हातेकर,उत्तम अंभोरे,श्रीकांत काकडे,आदित्य गावडे,कृष्णा काकडे, बळवंत मोरे, सुनील लोखंडे,ज्ञानेश्वर लोखंडे हे माजी विद्यार्थी उद्योजक सहभागी झालेले होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी उद्योग व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरते असे मत व्यक्त करून उद्योगाची ज्ञानगंगा चावडी ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी प्रा. लि. अहमदनगर संस्थेचे अध्यक्ष अमित मखरे यांच्या रूपाने सुरु झालेली आहे याबद्दल त्यांचे हृदय पूर्वक आभार मानले. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा आज्ञाधारकपणा असून व्यवसायाला आज्ञाधारकपणा आणि प्रामाणिकपणा या गुणाची आवश्यकता असते असे मत मांडून महाविद्यालयात जास्तीत जास्त ग्रामीण भागातले विद्यार्थी प्रवेशित असून ग्रामीण भागातला विद्यार्थी हा उद्योजक झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतातील वेगवेगळ्या राज्यातील व्यक्ती कशा वेगवेगळ्या उद्योगाशी जोडलेल्या आहेत त्या तुलनेत महाराष्ट्रातील व्यक्ती व तरुण उद्योग व्यवसायाकडे पाठ फिरवतात असे मत मांडून महाराष्ट्रातील तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे, तसेच महाविद्यालयात ‘वॉल ऑफ ऑनर’ (सन्मानाचा फलक) या फलकातील क्यू.आर. कोड स्कॅन करून माजी विद्यार्थी उद्योजकांच्या मुलाखती ऐकून व पाहून प्रेरणा घेत आहेत असे मत मांडले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा श्री मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला मा. श्री.पंकज गोंदकर,प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा, शाहूराज येवते,प्रा.डॉ.छाया जोशी,प्रा.यशोदा खुळखुळे, प्रा.सविता मानके, प्रा.दिपाली सोनवणे, प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. प्रियांका जाधव, प्रा.विकास दिघे, प्रा.शैला वाळुंज,प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.सोनाली अभंग,प्रा.दीपाली सोनवणे,प्रा.सोनाली तापकीर, प्रा.विश्वनाथ व्यवहारे,कार्यालयीन अधीक्षक- श्री.प्रवीण भावे,सौ.वर्षा ताजणे,श्री.सुशेन राठोड,श्री.वैभव बडवे.श्री.विनोद मोगल,श्री.श्रीकांत कांबळे व कला,वाणिज्य, व बीबीए(सी.ए.) शाखेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिलीप बारी यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.