शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “श्रद्धा वालकरची हत्या दिल्लीत झाली आहे. ही खूप दुर्दैवी घटना आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दिल्ली पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.” ते बुधवारी (१६ नोव्हेंबर) मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील वसईची श्रद्धा वालकर हिची तिचा प्रियकर आफताब पुनावाला याने निर्घृण हत्या केली. तसेच त्यांनतर मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात विल्हेवाट लावली. या प्रकरणी आफताब याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आफताब सध्या तुरुंगात आहे. याघटनेचा तपास दिल्ली पोलीस करीत आहे.
Advertisement