शबनम न्युज | पुणे
थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते,परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकूडणेच येते. समाजातील अशाच काही वंचीत,भीक मागून खाणारे मनोरुग्ण, बेघर गरीब कामगार, दिव्यांग बांधव यांना जात,धर्म,भाषा याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने दिघी- बोपखेल च्या वतिने थंडीपासून बचाव व्हावी, म्हणून ब्लॅंकेट वाटप करून मायेची उब दिली आहे.
यावेळी भाग्यदेव एकनाथ घुले, रमेश विरणक, दत्ता घुले, विशाल जाधव, अमित टिळेकर, दिनेश लोंढे, दत्तात्रय बाळु घुले, रोहिदास जोशी, दत्ता घुले, मारुती मोरे आदी उपस्थित होते.
Advertisement
रात्रीच्या सुमारास थंडीत कुडकूडणाऱ्या निराधाराना अचानक अडचणीच्या वेळी मिळालेल्या या मदतीच्या हातामुळे अनेक गरजवंतांनी आनंद व्यक्त होईल.