शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव , प्रभाग क्रमांक २३ मधील भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या वतीने शुक्रवार दि.०५ नोव्हेंबर रोजी दीपावली फराळ व स्नेहमिलन अनुसया मंगल कार्यालय , थेरगाव येथे आयोजित करण्यात आला होता .
थेरगाव परिसरातील बहुसंख्य नागरिक , बंधू-भगिनी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी या स्नेहमेळाव्यास हजेरी लावली . जेष्ठ नगरसेवक आणि मार्गदर्शक मा. शंकरशेठ जगताप व भाजप उपाध्यक्ष काळूरामजी बारणे यांनी या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती लावली .दिवाळीच्या निमित्ताने सगे-सोयऱ्यांच्या होणाऱ्या गाठी भेटी या आपसातील ऋणानुबंध अधिक घट्ट करीत असतात .
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून शिक्षण समिती सभापती मनीषाताई पवार , नगरसेवक अभिषेक बारणे ,स्विकृत नगरसेवक संदीप गाडे , प्रभाग अध्यक्षा करिष्मा ताई बारणे , युवा नेते तानाजीभाऊ बारणे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले .