शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, विद्यमान नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या माध्यमातून फिरते जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या फिरते जनसंपर्क कार्यालय मार्फत प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येत आहेत. तसेच प्रभागातील अनेक विकास कामांना या फिरते जनसंपर्क कार्यालयामार्फत गती मिळाली आहे. नागरिक आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कोठेही न जाता राहत्या जागीच जनसंपर्क कार्यालय त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. तसेच या समस्यांचे निराकरण त्वरित केले जात आहे.
नगरसेवक विलास मडीगेरी यांच्या जनसंपर्क कार्यालय उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. तसेच या उपक्रमाचे कौतूक ही करण्यात येत आहे. नगरसेवक विलास मडीगेरी हे नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यावर भर देत असतात त्यांनी सुरू केलेल्या फिरते जनसंपर्क कार्यालय मार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या उत्तम रित्या मिळत असून नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
नगरसेवक विलास मडीगेरी यांच्या वतीने आयोजित या फिरते जनसंपर्क कार्यालयाचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनी याबाबत आनंद व्यक्त करीत नगरसेवक विलास मडीगेरी यांचे आभार व्यक्त केले आहे.