शबनम न्युज | अमळनेर
येथील मंगल ग्रह सेवा संस्था लायन्स क्लब व मानिनी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ डिसेंबर २०२२ रोजी श्री मंगल ग्रह मंदिर येथे १००१ महिलांच्या मोफत मेमोग्राफी टेस्ट ब्रेस्ट कॅन्सर स्किनिंग टेस्ट केल्या जाणार आहेत, शिबिरार्थींना ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ डॉ. रोहन पाटील मोफत मार्गदर्शनही करणार आहेत.
शिबिराचा लाभ घेऊन इच्छिणाऱ्या महिलांसाठी जात, धर्म व उत्पन्नाची अट नसेल, मात्र त्यांनी दिनांक १ ते ३ डिसेंबर यादरम्यान श्री मंगल ग्रह मंदिर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे, शिबिरात ऐनवेळी येणाऱ्यांना लाभ मिळेलच, याची खात्री देता येणार नाही, कोणीही फोनवर संपर्क साधू नये, सर्वांनी मंदिरात सक्षम जाऊन संपर्क करावा, असे आवाहन मंगल ग्रह सेवा संस्था लायन्स क्लब व मानिनी फाउंडेशनचे संस्थापिका अध्यक्ष डॉ. भारती चव्हाण यांनी केले आहे.