शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
टाटा मोटर्स मित्र परिवाराच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील युवा उद्योजक सक्षम फाउंडेशनचे संस्थापक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष उद्योजक अतिश बारणे पाटील यांना मोशी येथील कार्यक्रमांमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त युवा योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्याप्रसंगी टाटा मोटर्स एम्पलॉइज युनियनचे मा कार्याध्यक्ष सतीश काकडे, सोसायटी उपाध्यक्ष सचिन टेकवडे, मा युनियन कामगार नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड बावधन चे अध्यक्ष राजेंद्र उभे, मा कामगार नेते गोपाळ बेलगे व टाटा मोटर्स मधील सन्माननीय जेष्ठ कामगार बंधू उपस्थित होते.
कोरोना काळात २ हजार कुटुंबांना स्वतःच्या खर्चाने जुपिटर हॉस्पिटलच्या मदतीने 1डोस दिला, तसेच मोशी परिसरामध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतःच्या खर्चाने चार ॲम्बुलन्स दिल्या, गेले सात वर्ष भीमाशंकरच्या आदिवासी भागामध्ये दिवाळी सरंजाम वाटप करत आहेत, कोरोना काळात भटक्या विमुक्त जमातीतील कुटुंबांना व गोरगरीब जनतेला स्वतःच्या खर्चाने किराणामाल भरून दिला, गणपती उत्सवामध्ये घरोघरी जाऊन मूर्ती संकलन करून स्वतःच्या खर्चाने कृत्रिम हौद बनवून विसर्जनाची व्यवस्था केली. या व अशा अनेक सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना युवा योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन टेकवडे यांनी केले आभार राजेंद्र उभे यांनी मानले.