शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्य प्रकरणी निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शाई फेक घटनेसंदर्भात महापुरुष सन्मान कृती समिती पिंपरी चिंचवडच्या पदाधिकार्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन, अटक प्रकरणी लावलेले कठोर गुन्हे मागे घेण्याविषयी तसेच याप्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे केलेले निलंबन कारवाई तात्काळ मागे घ्यावी, याबाबत चर्चा करण्यात आली त्यास ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या भेटीत समितीचे समन्वयक माजी नगरसेवक मारुती भापकर , मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले , कॉग्रेसचे शहराध्यक्ष डॉ कैलास कदम , वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे , राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत ,राष्ट्रवादी झोपड पट्टी विभाग शहराध्यक्ष संतोष निर्संगध , नरेंद्र बनसोडे , गिरीश वाघमारे , शिवशंकर उबाळे , विश्वनाथ जगताप, अविनाश चौधरी उपस्थित होते.