रितेश जिनिलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांची लाडकी जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.या ट्रेलरमधून या चित्रपटात एकतर्फी प्रेमाची गोष्ट दाखवली गेली आहे. नेहमी आपल्या विनोदाने हसवणारा रितेश यात गंभीर भूमिकेत दिसत आहेत. ज्या व्यक्तीवर प्रेम असते त्या व्यक्तीबरोबर लग्न न झाल्याने रितेशने साकारलेले पात्र हताश होते. दुसरीकडे जिनिलीयाने साकारलेले पात्र हे रितेशने साकारलेल्या पात्रावर जीवापाड प्रेम करत असते. प्रेमासाठी या दोघांची होणारी फरफट दाखवण्यात आली आहे. sportokbet
चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ट्रेलरमध्ये चित्रपटातील इतर कलाकार विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकार दिसत आहेत.
३० डिसेंबरला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे.