शबनम न्युज | पुणे
भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे दुःखद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुक्ता टिळक यांचे आज दुपारी साडेतीन वाजता दुःखद निधन झाले, उद्या शुक्रवार (दि. 23) रोजी सकाळी अंत दर्शनासाठी 9 ते 11 केसरी वाडा राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ समशानभूमी येथे 11 नंतर करण्यात येईल.
Advertisement
नगरसेविका, पुण्याच्या महापौर ते कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार असा मुक्ता टिळक यांचा प्रवास राहिला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावेळी आजारी असतानाही त्यांनी पक्षासाठी मतदान करण्यासाठी विधानभवानात जाण्याचा निर्णय घेतलेला, तेव्हाचे त्यांचे व्हायरल फोटो पाहून सर्वत्र कौतूक झाले होते.