विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी
शबनम न्युज | नागपूर
आज हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यावर उतरत कर्नाटक व शिंदे सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है… कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब… कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध… लोकशाहीचा खून करणार्या सरकारचा धिक्कार असो…कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय…सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा… भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो…अशा घोषणा काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात दिल्या.