शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त (२८ डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा स्नेह मेळावा पिंपरी चौक येथे आयोजित करण्यात आला.
या स्नेहमेळाव्यास राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, कला, क्रीडा, सहकार, साहित्य, वैद्यकीय, सामाजिक, प्रशासकीय, कामगार, विधी, तसेच इतरही क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी देशभक्तीपर गीतांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला त्याचप्रमाणे उपस्थितासाठी स्वागतपर पानसुपारी चहा पानाचे आयोजन करण्यात आले.
उपस्थिता मध्ये प्रामुख्याने पद्मश्री मुरलीकांत पेटकर, उपमहाराष्ट्र केसरी संभाजी राक्षे, मिस्टर इंडिया महाराष्ट्र श्री संदेश नलावडे, वर्ल्ड रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद झालेले (अल्फाबीट) मधील श्रेयस जोशी (वय वर्ष ४) मक्का मशीदीचे सदर गुलजार भाई शेख, ख्रिस्ती समजाचे नेते ॲड. बाजीराव दळवी, इंद्रायणी सहकारी बँकेचे संस्थापक एस. वी. चांडक, निवृत्त सहायक आयुक्त इन्कम टॅक्स मुंबई सुरेश विटकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नगरसेवक राजेंद्र जगताप, विनोद नढे, राहुल भोसले, शाम लांडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर,अनंत को-हाळे, अख्तर चोधरी, उर्मिला काळभोर, सुप्रिया सोलांकुरे, निर्मलाताई कदम, कामगार नेते बाबा कांबळे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, काशिनाथ नखाते, ओबीसी महासंघाचे अनंदा कुदळे, संभाजी ब्रिगेड चे गणेश दहीभाते, लहू लांडगे, सतीश काळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, छावा युवा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, हाजी दस्तगीर मणियार, युसुफ कुरेशी,१६३ वेळा रक्तदान केलेले रक्तदाते संतोष ताम्हणकर, राहुल भोईर, रूनाल मॅक्सवल, हरीष नखाते, कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप काळे, अंध इंडिया टीम वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये सहभाग झालेली कोमल गायकवाड, भाग्यश्री मूगी, दिपाली कांबळे, पत्रकार शबनम सय्यद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नक्षत्रांच्या अभ्यासामध्ये नोंद झालेली रत्नेश्वरी मुळी, बेस्ट फिल्म ज्यूरीचा बारावा दादासाहेब फाळके पुरस्कार ” इरगाल ” फिल्मचे रशीद निंबाळकर, बेस्ट फिल्म सोशल अवॉर्ड ” टिकटिक ” फिल्म चे डायरेक्टर तुषार बोकेफोडे, , ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय पंच प्रमोद मोरे, पौर्णिमा जाधव, इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉ.मनीषा गरुड ब्राह्मण समाज संघटनेचे पदाधिकारी डॉ. सचिन बोधनी, डॉ. संजीव संभुस, जैन समाज संघटनेचे पदाधिकारी अतुल धोका आदी व मान्यवर ही अनेक मान्यवरानी स्नेहमेळाव्यास भेट दिली.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ कैलास कदम म्हणाले, “काँग्रेस पक्षाला 138 वर्षांचा इतिहास आहे, देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेस पक्ष या देशामध्ये त्याग, समर्पण, बलिदान, कर्तव्य, समता, देशप्रेम याची शिकवण देत आला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वतंत्र्य देशाची संपूर्ण जडणघडण, सर्वांगीण विकास काँग्रेसमुळे शक्य झाला. आता सध्या भाजपा काळात झालेली देशाची दुरावस्था व कठीण परिस्थिती पाहता देशातील नागरिकांना एकमेव काँग्रेस पक्षच आशादायक,दिशादर्शक व संकट मोचक म्हणून दिसत आहे. देशात भारत जोडो यात्रा ही नवा इतिहास घडवत सत्ता परिवर्तन घडवेल हा विश्वास नागरिकांमध्ये आहे”
कार्यक्रमाच्या उत्तम आणि भव्यदिव्य नियोजनाबाबत उपस्थित नागरिकांनी व मान्यवरांनी दाद दिली आणि उत्कृष्ट उपक्रमाचे आयोजनाबद्दल शहराध्यक्षांचे अभिनंदन व कौतुकही केले.
काँग्रेस स्थापना दिनाच्या स्नेह मेळाव्याच्या उत्स्फूर्त आयोजनामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, नव उत्साह, आणि स्फूर्ती निर्माण झाली असल्याची शहरात चर्चा आहे.
शहर काँग्रेसचे पदाधिकारी माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ महिला नेत्या शामला सोनवणे, निगार बारस्कर, शाम अगरवाल, बाबू नायर, मनोज कांबळे, शोभा पगारे, स्वाती शिंदे, अभिमन्यू दहितुले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक काँग्रेस चे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक काँग्रेस चे विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक काँग्रेस चे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, महीला काँग्रेसच्या अध्यक्ष सायली नढे, डॉ. मनीषा गरुड, युवक काँग्रेस चे अध्यक्ष कौस्तुभ नवले, NSUI चे उमेश खंदारे, सेवादाल चे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, प्रोफेशनल काँग्रेस चे दाहर मुजावर, स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरवदे, शहर झोपडपट्टी विभागाचे अध्यक्ष प्रा. बी बी शिंदे, ग्राहक विभागाचे अध्यक्ष झेवियर अँथनी, प्रियांका कदम, छायावती देसले, वैशाली दमवाणी, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, राजाराम भोंडवे, उमेश बनसोडे, निर्मला खैरे, रवी नांगरे, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, संदीप शिंदे, सचिन कोंढरे, किरण खजेकर, मिलिंद फडतरे, अर्जुन लांडगे, सतीश भोसले, फिरोझ इनामदार, निखिल भोईर, युनूस बागवान, जुबेर खान, आकाश शिंदे, सौरभ शिंदे, स्वप्नील बनसोडे, हिरा जाधव, मिलिंद बनसोडे, किरण नढे, दीपक भंडारी, पांडुरंग जगताप, भास्कर नारखेडे, नासीर चोधरी, रवी कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.