शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव आळंदी दिनांक १८/०१/ २०२३ वार बुधवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आळंदी नगरपालिका माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानाचे महाविद्यालयांमध्ये आयोजन ठीक सकाळी ११: ३० वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संजीव कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले, प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार -संचालक माननीय श्री मयूर ढमाले सर अभियानानिमित्त उपस्थित होते.
या ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानानिमित्त प्रमुख वक्त्ते म्हणून लाभलेले मा. श्री. किरण आरडे (शहर समन्वयक आळंदी नगरपालिका ) यांनी माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती या विषयी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी रोपवाटिकेची निर्मिती, जैव-विविधता रजिस्टर, वृक्ष आराखडा, एकल वापर प्लॅस्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन, याबद्दल त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केल.त्यानंतर मा.श्री. अर्जुन मेदनकर यांनी माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती या विषयी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच ई – कचरा, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापन यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले,या माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानाप्रसंगी मा.श्री. हनुमंत लोखंडे (स्वच्छता निरीक्षक आळंदी नगरपालिका ) प्रा. प्रवीण डोळस, प्रा. माणिक कसाब उपस्थित होते.त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रा. कैलास अस्तरकर (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ) यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.