शबनम न्युज | पुणे
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरात आपली पाळेमुळे सक्षमपणे रोवत आहे. सक्षम कार्यकर्ता सक्षम शाखा या अंतर्गत पुण्यातील काळजेवाडी, चऱ्होली, बुद्रुक येथे आम आदमी पार्टीच्या शाखेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाली. याप्रसंगी भविष्यात परिसरातील मेहनती अभ्यासू, उभरते नेतृत्व म्हणून संपूर्ण शहरात आम आदमी पार्टी पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करणार असल्याचे चेतन बेंद्रे यांनी सांगितले. आम आदमी पार्टी पक्षाच्या शाखेच्या वतीने जनतेला विविध माध्यमातून लाभ मिळावा, तसेच पक्षातील कार्यकर्ते व त्यांचा अनुभव पाहता त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या शाखेमार्फत जनतेला मिळावा आणि पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम आदमी पक्ष सर्वतोपरी शहरात काम करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
काळजेवाडी, चऱ्होली, बुद्रुक येथे आम आदमी पक्षाच्या शाखेचे प्रमुख म्हणून दत्तात्रय काळजे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे इमरान खान हे त्यांना सहकार्य करणार आहेत.
शाखा उद्घाटन प्रसंगी यशवंत कांबळे , ब्रह्मानंद जाधव , सुरेश भिसे , सरोज कदम ताई , स्वप्निल जेवळे , संजय काळजे , स्मिता काळजे , अंकुश तापकीर , अक्षय तापकीर , लहू तापकीर , संतोष पाटोळे , तपस्वी काळजे ,वर्षा काळजे , नीता काळजे , पूजा काळजे , स्वाती तापकीर , प्रिया काटे रोहिदास पानसरे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दत्तात्रय काळजे यांना नवीन शाखा उद्घाटनावाच्या शुभेच्छा दिल्या.