‘
श्री गजानन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी श्री.योगेश बाबर व उपाध्यक्षपदी श्री.दिलीप देशमुख यांची निवड’’
शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या सन २०२३-२०२८ या कालावधी करिता संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. दिनांक ०६/०२/२०२३ रोजी नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यातर्फे निवडणूक अधिकारी डॉ.शीतल पाटील, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-६ यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत बँकेच्या अध्यक्षपदी श्री.योगेश मधुकर बाबर यांची व उपाध्यक्षपदी श्री.दिलीप जयवंतराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक श्रीमती गोरखे अनुराधा गणपत, श्री.वाणी रमेश शंकर, श्री.सावंत दिलीप भगवान, श्री.काळभोर अशोक विठ्ठलराव, श्री.इनामदार अतुल अशोक, श्री.बाबर अमित प्रकाश, श्री.बाबर धीरज गजानन, श्री.निकम अमोल आनंदराव, श्री.वाळके कृष्णा ज्ञानोबा, श्री.बोरूडे भास्कर वामन, श्री.थारेवाल धर्मेंद्र भास्कर, सौ.भांगडिया वंदना अनिल व सौ.जाधव वत्सला हिंदुराव उपस्थित होते.
श्री गजानन सहकारी बँक ही पिंपरी चिंचवड शहरातील अग्रगण्य सहकारी बँक असून बँक २३ वर्षे जुनी बँक आहे. बँकेच्या दोन शाखा असून आर्थिक स्थिति उत्तम आहे. श्री.बाबर हे गेली पंधरा वर्षे शहराच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच बँकेचे जेष्ट संचालक श्री.देशमुख हे गेली तीस वर्षे शहारच्या सामाजिक तसेच वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.योगेश बाबर व नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री.दिलीप द्श्मुख यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून पुढील काळात बँकेच्या प्रगतिसाठी कटिबद्ध राहू असे सांगितले