मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम 2023 मध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंच्या प्रयत्नांचा सर्व महाराष्ट्रात कौतुक होत आहे. आज खेलो इंडिया युथ गेम 2023 स्पर्धेत हरियाणा विरुद्ध महाराष्ट्र कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत हरियाणा संघ (30-29) 1 गुणांनी विजयी झाला. मात्र, महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली, त्यांच्या या प्रयत्नांचा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे.
मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या दिवसापासून आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र आज झालेल्या स्पर्धेत हरियाणा संघाकडून महाराष्ट्राच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. संघ पराभूत झाला पण महाराष्ट्र मधील प्रत्येक कबड्डीच्या चाहत्यास अभिमान वाटेल अशी कामगिरी महाराष्ट्र मुलींनी केली.
मुलींचा संघ –
हरजीत कौर संधू, आरती ससाने, मनीषा राठोड, निकिता लंगोटे, याशिका पुजारी, प्रतीक्षा लांडगे, समृद्धी मोहिते, गायत्री अवचारे, स्नेहा पवार, भूमिका गोरे, ऋतुजा आंबी, काजल मोंढे.