शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
संस्कार भारती पिंपरी चिंचवड आणि आपले चिंचवड व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज क्रांतिकारक चापेकर बंधू यांच्या जीवनावर आधारित द प्लॅन हा नाट्यप्रयोग चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आपले चिंचवड व्यासपीठच्या अध्यक्षा व नगरसेविका अश्विनी ताई चिंचवडे व गजानन दादा चिंचवडे त्याचप्रमाणे संस्कार भारती पिंपरी चिंचवड अध्यक्ष सचिनदादा काळभोर, सचिव लीना ताई आढाव यांच्या वतीने योगेश सोमण (नाट्य दिग्दर्शन लेखक ) तसेच रश्मी देव ( नाट्य दिग्दर्शक) मिलिंद भोळे (संस्कार भारती पश्चिम प्रांत संपर्क मंत्री) नाट्यकलाकार यांचा चापेकर बंधू यांचे शिल्प मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास विनीताताई देशपांडे , साहित्य विधा प्रमुख प्रणिता ताई बोबडे, सहप्रमुख शुभदा दामले, प्रियाताई जोग, रांगोळी प्रमुख गौरी कारंडे, बाल विभाग प्रमुख सायली काणे, चित्रकला विधा प्रमुख प्रफुल्ल भिष्णूरकर, संगीत विधा सहप्रमुख सौ पल्लवी मांडवखोत ठाकरे, आणि इतर रसिकप्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. द प्लॅन नाट्यप्रयोगासाठी सर्व कलासाधकांची भली मोठी फौज पाहायला मिळाली, अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष हर्षद कुलकर्णी, कोषाध्यक्ष सायली देवधर , नाट्य विधा प्रमूख किरण येवलेकर, सह विधा प्रमूख प्रसन्न कुलकर्णी, सह विधा प्रमूख अमेय देशपांडे, बालविभागप्रमुख सायली काणे, आणि मयूर इंदलकर,अनिकेत यचकल, अमेय कुळकर्णी , तसेच मधुरा भागवत, वैष्णवी गर्गे , उत्कर्षा, गौरी देशपांडे, आणि समिती सदस्य, विधा सदस्य यांनी परिश्रम घेतले.